WhatsApp Username Feature : आपल्याला समोरच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचा असेल, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे. मात्र, आता नंबर सेव्ह करणं गरजेचं पडणार नाही. व्हॉट्सअॅप आता नवीन प्रक्रिया सुरु करणार आहे. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला संपर्क किंवा शोधण्यासाठी आणखी सोपं होऊ शकतं. व्हॉट्सअॅपवर केवळ यूजरनेमच्या मदतीने देखील एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतो. यामुळे आपला मोबाईल नंबर शेअर करण्याची आवश्यकता भासणार नाही.
इन्स्टाग्राम, किंवा ट्विटरवर अकाउंट सुरू करताना ज्याप्रमाणे आपल्याला एक युनिक यूजरनेम मिळतो त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअॅप देखील आपल्याला एक यूजरनेम देणार आहे. जेणेकरून हे यूजरनेम सर्च केल्यानंतर त्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो. एका व्यक्तीचं यूजरनेम हे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळं असणार आहे. हे फीचर सध्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध असल्याची माहिती WABetaInfo या वेबसाईटने दिली आहे.
ही कंपनी व्हॉट्सअॅपवर होत असलेल्या नवनवीन चाचण्यांची माहिती देत असते. या फीचरची बीटा चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच हे सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच व्हॉट्सअॅप यूजरनेम वापरून इतरांना शोधल्यामुळे व्हॉट्सअॅप यूजर आपली गोपनीयता मजबूत ठेवेल, वापरकर्ते त्यांचे फोन नंबर उघड न करता इतरांशी कनेक्ट करण्यात सक्षम होतील. हे विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांना त्यांच्या वैयक्तिक माहितीवर नाव गुप्त ठेवण्याची किंवा नियंत्रण ठेवण्याची इच्छा आहे.
आपल्या यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षितता राखण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन अपडेट्स आणत असतं. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने चॅट्ससाठी एक्स्ट्रा लॉक फीचर लाँच केलं होतं. यामुळे यूजर्स ठराविक चॅट वेगळ्या पासवर्डने लॉक करू शकतात. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना शोधणे ही केवळ मित्र, कुटुंब किंवा इतर लोकांशी कनेक्ट होण्याची प्रक्रिया करू शकते, कारण ते फोन नंबर विचारण्याची गरज पडत नाही. वापरकर्ते फक्त त्यांचे यूजरनेम शेअर करतील, ज्यामुळे इतरांना अॅपमध्ये शोधणे आणि त्यांच्याशी कनेक्ट करणे सोपे होईल, असे WABetaInfo ने सांगितले आहे.