नवी दिल्ली : सध्या WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युजर्सच्या मागणीनुसार, अनेकदा यामध्ये काही बदलही केले जात आहेत. असे असताना आता WhatsApp ने Giphy स्टिकर कलेक्शन लाँच केले आहे. या नव्या स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्ही स्वत: स्टिकर्स बनवू शकता.
WhatsApp ने iOS आणि Android युजर्ससाठी Giphy स्टिकर कलेक्शन आणले आहे. याशिवाय Meta ने WhatsApp साठी कस्टम स्टिकर मेकर देखील लाँच केला आहे. म्हणजेच आता तुम्ही WhatsApp वर स्वतः स्टिकर्स तयार आणि डिझाईन करू शकता. WhatsApp मध्ये आलेल्या नवीन फीचर्समध्ये स्टिकर कलेक्शनचाही समावेश करण्यात आला आहे. या सर्व नवीन फीचर्सची माहिती WhatsApp ने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.
यानुसार, आता नवीन अपडेटनंतर युजर्संना Giphy स्टिकर्ससाठी इतर कोणत्याही ॲपच्या वेब ब्राउझरवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. WhatsApp मध्येच हे स्टिकर उपलब्ध असेल. iOS युजर्ससाठी त्यांचे अपडेट यावर्षी जानेवारीमध्येच आले आहे.