नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडिया साईट, अॅप्सचा वापर केला जात आहे. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि व्हॉट्सअॅपसारख्या अॅपचा समावेश आहे. त्यात व्हॉट्सअॅप युजर्सची संख्याही जास्त आहे. असे असताना कंपनीने भारतीय युजर्संना दणका दिला आहे. कारण, लाखो भारतीयांचे अकाउंटच बंद केले आहे.
व्हॉट्सअॅप कंपनीने आत्तापर्यंत जवळपास 70 लाख युजर्सचे अकाउंट बंद केले आहे. कंपनीच्या पॉलिसींचे उल्लंघन करणे, स्पॅम, स्कॅम, चुकीची माहिती आणि हानिकारक मजकूर पब्लिश करणे यांसारखी कारणे आहेत. त्यामुळे अशा युजर्सची अकाउंट बंद करण्यात आली आहेत. याशिवाय, जर कोणी देशाचा कायदा मोडला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.
व्हॉट्सअॅप कंपनीकडून ही सर्व अकाउंट्स 1 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत बंद करण्यात आली आहेत. या लोकांनी अॅपचा गैरवापर केला आहे. यापुढेही जर युजर्सने कंपनीच्या पॉलिसींचे उल्लंघन केले तर त्यांचेही अकाउंटस बॅन केले जातील, असेही कंपनीने सांगितले आहे.