मुंबई : सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. त्यात मनोरंजन क्षेत्रासंबंधित काही अॅप्स असो किंवा वेबसाईट्स त्याचा वापरही वाढताना दिसत आहे. असे असताना Netflix वापरणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पण, ते वापरताना अनेकदा स्क्रीनशॉट घेता येत नव्हता. मात्र, आता तिथून स्क्रीनशॉट घेता येणार आहे.
आता नेटफ्लिक्सने ‘मोमेंट्स’ नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही सीनचा स्क्रीनशॉट घेऊन तो शेअर करू शकता. हे फीचर नुकतेच आयफोन यूजर्ससाठी आले आहे आणि लवकरच अँड्रॉईड यूजर्सना देखील ते मिळेल. तुम्ही नेटफ्लिक्सवर एखादी मालिका किंवा चित्रपट पाहत आहात आणि तुम्हाला एक सीन खूप आवडला असेल तर आता तुम्ही तो सीन सेव्ह करू शकता.
Netflix च्या नवीन फीचर Moments च्या मदतीने तुम्ही कोणताही सीन सेव्ह करू शकता आणि नंतर तो पुन्हा पाहू शकता. तुम्हाला फक्त त्या सीनवर टॅप करून सेव्ह करावे लागेल. जेव्हा तुम्ही ती मालिका किंवा मूव्ही पुन्हा पाहता तेव्हा तुम्ही थेट त्या सेव्ह केलेल्या सीनकडे जाऊ शकता.