सध्या अनेक गॅजेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार गॅजेट्स लाँच करण्याला अनेक कंपन्यांकडून प्राधान्य दिलं जातं. स्मार्टफोन पाठोपाठ इअरबड्स खरेदी करण्यामध्ये बहुतांश जणांचा कल दिसून येतो. पण, सध्या महागडे इअरबड्स असल्याने ते घेण्यास टाळले जाते. मात्र, तुम्हाला असे काही स्वस्तातील इअरबड्सची माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत.
OnePlus Nord Buds 2 हा एक बेस्ट असा इअरबड्स आहे. जर तुम्हाला क्वालिटीशी तडजोड करायला आवडत नसेल तर तुम्ही OnePlus वरून प्रीमियम इयरबड्स खरेदी करू शकता. Amazon वर त्याची किंमत फक्त 1,599 रुपये आहे. OnePlus Nord Buds 2 12.4mm ड्रायव्हर्ससह येतो. या बड्समध्ये क्वाड-मायक्रोफोन सेटअप देण्यात आला आहे. या बड्समध्ये क्लिअर कॉलिंगचा अनुभव घेता येऊ शकणार आहे. या इअरबड्सला IP55 रेटिंग देण्यात आला आहे. यामध्ये 36 तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळू शकणार आहे.
Poco Pods हा बड्स केवळ लूकला स्टायलिश नाही तर त्यांची किंमतही खूप स्वस्त आहे. Poco Pods फ्लिपकार्टवरून 1099 रुपयांना खरेदी करता येणार आहे. Poco Pods 12mm ड्रायव्हर्ससह उपलब्ध आहे. तसेच, याची बॅटरी लाईफही चांगली असून, 30 तासांपर्यंत फोन चालू शकतो. याशिवाय, कंपनी Poco Pods मध्ये ENC चे फीचर देखील देत आहे.
TECSOX ALPHA हा देखील एक बजेटमधील बड्स आहे. यामध्ये 13 MM डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत, या बड्समध्ये चांगला बास आहे जो उत्कृष्ट साऊंड क्वालिटी देऊ शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर, हे इअरबड 40 तासांपर्यंत बॅकअप देऊ शकते. हा इअरबड्स तुम्ही Amazon वरून 1299 रुपयांना खरेदी करू शकता.