नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण स्मार्टफोन वापरून कंटाळले असतील काहींना तर Apple चा iPhone घ्यायची इच्छा असेल. पण याच्या किंमती पाहून घ्यावा की नको असा प्रश्नच पडतो. तुम्ही देखील याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, Apple चा iPhone तब्बल 10 हजारांपर्यंत स्वस्त झाला आहे.
Apple कंपनी नवीन iPhone लाँच केल्यानंतर जुन्या मॉडेलच्या किंमती कमी करते. यावेळी देखील Apple ने 9 सप्टेंबर अर्थात सोमवारी ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये iPhone 16 सीरीज लाँच केली आहे. या लाँचिंगनंतर आता जुन्या सीरिजच्या किंमती कमी होताना दिसत आहे. Apple ने आपल्या जुन्या मॉडेल्सच्या किमती 10,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. Apple ने iPhone 16 सीरिजची विक्री वाढावी म्हणून काही जुने iPhone देखील बंद केले आहेत.
2022 मध्ये लाँच झालेले मागील वर्षाचे iPhone 15 आणि iPhone 14 आता Apple Store वर 10,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. iPhone 15 चे बेस मॉडेल म्हणजेच 128GB व्हेरिएंट आता 69,900 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे, तर त्याची लाँचिंग किंमत 79,900 रुपये आहे. 256GB व्हेरिएंटची किंमत आता 79,900 रुपये आहे, तर आधी ती 89,900 रुपये होती.