नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यानुसार, फीचर्सही बेस्ट दिले जातात. पण, या स्मार्टफोन्सच्या किमती त्यांच्या फीचर्सनुसार वाढत जातात. मात्र, तुम्हाला जर बजेटमध्ये फोन घ्यायचा असेल अन् तोही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत, तर आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स सांगणार आहोत.
Vivo चा iQOO Z9 Lite 5G हा एक बेस्ट स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 50MP Sony AI कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Amazon वर 10,499 रुपयांच्या किमतीत आपल्याला मिळू शकणार आहे. मात्र, सर्व बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना थेट 500 रुपयांची सूट मिळत आहे आणि त्याची किंमत 9,999 रुपयांपर्यंत मिळेल. हा स्मार्टफोन Dimensity 6300 5G प्रोसेसरसह येतो.
तसेच प्रसिद्ध कंपनी Xiaomi चा Redmi 13C 5G हा देखील एक बेस्ट स्मार्टफोन आहे. या फोनवर 1000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो. त्याचा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 10,499 रुपयांच्या किंमतीला मिळू शकतो. पण कूपन डिस्काउंटमुळे हा फोन तुम्हाला 9,499 रुपयांमध्ये ऑर्डर करता येऊ शकतो. या फोनमध्ये 90Hz डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6100+ 5G प्रोसेसर आहे.
POCO M6 5G हा एक 5G स्मार्टफोन आहे. हा तुम्हाला 9,249 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम व्हेरिएंट देखील उपलब्ध असून, तो फोन तुम्हाला 9,999 रुपयांच्या किमतीत ऑर्डर करता येणार आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आणि 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी मिळते.