नवी दिल्ली : सध्या बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार नवनवीन स्मार्टफोन्सही उपलब्ध झाले आहेत. पण चांगले फिचर्स हवे असतील तर स्मार्टफोन्सच्या किमतीही वाढतात. तुम्हाला देखील स्मार्टफोन घ्यायचा असेल पण तुमचं बजेट 20 हजारांच्या आसपास असेल तर आम्ही तुम्हाला काही स्मार्टफोन्सची माहिती सांगणार आहोत…
Redmi Note 13 5G
Redmi चा हा फोन फुल एचडी 6.67 सह मिळत असून, यामध्ये तुम्हाला अल्ट्रा-नॅरो बेझल्स आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 डिस्प्ले प्रोटेक्शन असून, उच्च कार्यक्षमतेसाठी हा MediaTek Dimensity 6080 6nm octa-core 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8GB व्हर्च्युअल रॅमसह 16GB पर्यंत RAM आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 16,999 रुपयांमध्ये ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G
OnePlus Nord CE 3 Lite 5G या स्मार्टफोनमध्ये EIS सह 108 MP मुख्य कॅमेरा असून, त्याचा सेल्फी कॅमेरा 16 MP चा असणार आहे. यात 6.72-इंचाचा डिस्प्ले आहे आणि तो 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. यात 67W SuperVOOC एन्ड्युरन्स चार्जिंग व्हर्जन आहे, जे लवकर चार्ज होते. हा स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये मिळवता येऊ शकतो.
Lava Agni 2 5G
हा स्मार्टफोन 6.78K डिस्प्लेसह येतो आणि तुम्ही Widevine L1 DRM संरक्षणासह 120Hz FHD+ वक्र AMOLED डिस्प्लेसह उच्च रिझोल्यूशनमध्ये तुमच्या सामग्रीचा आनंद घेऊ शकता. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर 2.6GHz MediaTek प्रोसेसरवर चालतो. हे तुमच्यासाठी सुपरफास्ट 66W चार्जरसह येते, जे 16 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 50% पर्यंत चार्ज होते. हा स्मार्टफोन तुम्हाला 16,999 रुपयांमध्ये ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.