नवी दिल्ली : ॲपल कंपनीचे उत्पादन जगभरात आहेत. कंपनीकडून त्यांच्या उत्पादनावर अनेक विशेष फीचर दिले जात आहे. त्यात आता तुम्हालाही ॲपल आयपॅड घ्यायचा असेल. पण तुमचे बजेट कमी असेल, तर आता ॲपल कमी बजेटच्या ग्राहकांसाठी परवडणारा आयपॅड लवकरच लाँच करणार आहे.
नवीन आयपॅड मॉडेल पुढील वर्षी ग्राहकांसाठी लाँच केले जाऊ शकतात, अशी माहिती दिली जात आहे. ॲपल 2024 मध्ये कमी किमतीत नवीन आयपॅड मॉडल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. इतकेच नाही, तर ॲपल आपले उत्पादन संसाधन व्हिएतनाममध्ये हलवत आहे. चीननंतर व्हिएतनाम हा एक देश आहे, जो इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे उत्पादन केंद्र म्हणूनही ओळखला जातो. सॅमसंग आणि इतर कंपन्या व्हिएतनाममधून जगभरात उत्पादने निर्यात करतात. बीवायडी आयपॅड उत्पादकांपैकी एक आहे आणि ही कंपनी ॲपलची उत्पादन संसाधने व्हिएतनाममध्ये हलवण्याचे काम करत आहे. ही कंपनी ॲपलसाठी आगामी कमी किमतीच्या आयपॅडच्या निर्मितीसाठी काम करेल अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.
ॲपल आयपॅड आणि मॅकबुकच्या विक्रीत घट झाल्याचे उघड केले आहे. यावरून ॲपल आता विक्रीच्या घसरत्या आकड्यांना चालना देण्यासाठी लो बजेट रेंज मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ॲपल कंपनीच्या आगामी आयपॅड मॉडेल्समध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी M3 चिपसेट वापरता येणार आहे.