नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपला नवीन X200 सीरीजचा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. या सीरीजअंतर्गत, कंपनीने Vivo X200 आणि Vivo X200 Pro हे दोन फोन्स लाँच केले आहेत. आता या फोनच्या विक्रीलाही सुरुवात झाली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरसह मिळत आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर काम करतात.
Vivo च्या या स्मार्टफोन्समध्ये OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 90W फास्ट चार्जिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे फोन तुम्ही आकर्षक किमतीत खरेदी करू शकता. कंपनी पहिल्या सेलमध्ये अनेक हजार रुपयांची सूटही देत आहे. या फोन्सची सीरीज तुम्ही Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता. या सीरीजची किंमत 65,999 रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत तुम्हाला Vivo X200 चा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. तर त्याच्या 16GB रॅम + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 71,999 रुपये आहे.
Vivo X200 Pro फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये 16GB RAM + 512GB स्टोरेजमध्ये येतो, ज्याची किंमत 94,999 रुपये आहे. हँडसेटवर 9500 रुपयांची झटपट बँक सूट उपलब्ध आहे. ही सूट निवडक बँक कार्डांवर आहे. याशिवाय कंपनी एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटीही देत आहे