नवी दिल्ली : एलॉन मस्क यांनी काही वर्षांपूर्वी ट्विटरची धुरा हाती घेतली. यानंतर त्यांनी नाव बदलून ‘एक्स’ केले. यानंतर लोगो बदलण्यातआला. आता त्यांनी त्याची URL बदलल्याचे समोर आले आहे. म्हणजे तुम्हाला ट्विटर कुठेही दिसणार नाही. URL देखील ‘X.com’ने सुरू होणार आहे.
तुम्ही Twitter च्या URL वर गेलात तरी ते थेट ‘X’ वर ट्रान्सफर होईल. वेब आवृत्तीमध्येदेखील उघडल्यावर ते समान दिसेल. हा एक मोठा निर्णय असून, कंपनीने आपली URL पूर्णपणे हस्तांतरित केली आहे. ट्विटर 14 एप्रिल 2022 रोजी विकत घेतले गेले. तेव्हापासून सतत बदल होत असून, 23 जुलै 2023 रोजी त्याचे नावही बदलण्यात आले.
एलॉन मस्क यांनीही याबाबत ट्विट करत माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, आता तुम्हाला सर्व माहिती फक्त X वरच मिळेल. याआधी फक्त Twitter URL चा वापर केला जात होता. X ने आपल्या पोस्टमध्ये आपल्या यूजर्सला URL बदलल्याची माहिती देखील दिली आहे. याशिवाय एलॉन मस्क यांच्याकडून अॅपमध्ये अनेक बदल करण्याचाही विचार केला जात आहे.
मस्क हे अॅप स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी एक सुपरॲप करण्याचा विचार करत आहे. किंबहुना, त्याच्या मदतीने कोणीही पेमेंटदेखील करू शकेल, अशी इच्छा आहे. याशिवाय युजर येथे इतर सुविधा देखील मिळू शकतात, याच्या मदतीने लोक लवकरच ट्रेन आणि विमान तिकीट बुक करू शकतील. यावर लवकरच गेमिंग सेवाही सुरू होणार आहे.