नवी दिल्ली : सध्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात देशातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेली ॲक्सिस बँक पुढील महिन्यापासून क्रेडिट कार्ड शुल्कात बदल करणार आहे. 20 डिसेंबर 2024 पासून ही शुल्क वाढ होणार असल्याची माहिती दिली जात आहे.
Axis Bank ने EDGE Rewards किंवा Miles वापरण्यावर रिडिम्शन चार्जेस लागू केले आहेत. ग्राहकांकडून कॅश रिडिम्शनसाठी 99 (अधिक 18 टक्के GST) आणि मायलेज प्रोग्राममध्ये पॉईंट हस्तांतरित करण्यासाठी 199 (अधिक 18 टक्के GST) आकारले जातील. या कार्ड्समध्ये ॲक्सिस बँक ॲटलस क्रेडिट कार्ड, Samsung Axis Bank Infinite क्रेडिट कार्ड, सॅमसंग ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड, ॲक्सिस बँक मॅग्नस क्रेडिट कार्ड या कार्ड प्रकाराचा समावेश आहे.
Axis Bank Reserve Credit Card आणि Axis Bank Olympus आणि Horizon सारख्या Citi-Protégé कार्डांवर या बदलांचा कोणताही परिणाम होणार नाही. ऑटो डेबिट रिव्हर्सल आणि चेक रिटर्न पेमेंट रकमेच्या 2 टक्के दराने आकारले जातील, किमान मर्यादा 500 रुपये आणि कोणतीही कमाल मर्यादा नसेल.