नवी दिल्ली : जर एखाद्याला सविस्तर काही माहिती किंवा रेकॉर्ड पाठवायचे असल्यास ई-मेल केला जातो. पण अनेकदा अनावश्यक मेल देखील आपल्या नकळत स्टोअर होतात. त्यामुळे हे डिलीट करायचा कंटाळा अनेकांना येतो. पण तुम्हाला माहितीये का हे मेलदेखील ऑटोमॅटिक डिलीट करता येऊ शकतात.
Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. Gmail चे प्रमोशनल ई-मेल डिलीट केले नाहीत तर इनबॉक्स नको असलेल्या ई-मेल्सनेच पूर्ण भरून जातो. नको असलेले ईमेल ऑटोमॅटीक डिलीट करता येतात. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम emails-tidio.pro वरून जीमेल dio हे इन्स्टॉल करावं लागेल.
हे इन्स्टॉल झाल्यानंतर Gmail अकाउंटमध्ये जाऊन इनबॉक्समधील कोणताही एक मेसेज ओपन करावं लागेल. तेथे देण्यात आलेल्या ई-मेल स्टुडिओ आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जीमेल आयडी आणि पासवर्डवरून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर लिस्टमध्ये देण्यात आलेल्या ‘ई-मेल क्लीनअप’ पर्यायावर टॅप करा.
Gmail मध्ये जो टास्क करायचा आहे त्यासाठी अॅड न्यू रूलवर क्लिक करा. येथे नवीन नियमाप्रमाणे एखाद्या खास ई-मेल आयडीला मार्क करू शकता. या प्रोसेसने Gmail ला एखाद्या खास ई-मेल आयडीवरून एका महिन्यात आलेले सर्व ई-मेल्स डिलीट करण्याची कमांड देता येते.