नवी दिल्ली : Google कडून आपल्या युजर्ससाठी अनेक फीचर्स लाँच केले जात आहेत. त्यात Google Play, Google Docs, Google Pay आणि Google Lens सह अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यात आता Google Lens मध्ये एक नवीन अपडेट आलं आहे. या माध्यमातून मोबाईलमध्ये बोलूनही Search करता येणार आहे.
Voice Search हे फीचर छोट्या व्हिडिओ फीचर्ससारखे आहे. मात्र, ते फोटोसह देखील कार्य करते. युजर्सना त्यांचा कॅमेरा कोणत्याही वस्तूवर केंद्रित करता येणार आहे. यानंतर, तुम्हाला शटर बटण दाबावे लागेल आणि एक प्रश्न विचारावा लागेल, ज्याचे उत्तर AI द्वारे दिले जाईल. Google Lens एका छोट्या व्हिडिओ फीचरसह अपडेट करण्यात आले आहे.
याशिवाय गुगल लेन्सला व्हॉईस सर्च फीचर देखील अपडेट केले जाणार आहे. म्हणजेच तुम्ही बोलूनही Google Lens चा वापर शकता. तसेच या टूलचा वापर करून आता ऑनलाईन शॉपिंग करता येणार आहे.