Technology : WhatsApp चा वापर फक्त भारतातच नाहीतर जगभरात केला जात आहे. त्यामुळे कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणले जात आहेत. त्यात आता WhatsApp एका नवीन फिचरवर काम करत आहे, ज्यानंतर व्हॉईस मेसेज टेक्स्ट मेसेजमध्ये कन्वर्ट अर्थात रुपांतरित करता येऊ शकणार आहे.
Voice Message Transcriptions असे या फिचरचे नाव आहे. सध्या हे फिचर बाय डिफॉल्ट ॲक्टिव्ह नसेल. WhatsApp च्या नवीन फिचरची टेस्टिंग अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.24.15.5 वर केली जात आहे. WhatsApp चे व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन फिचर हिंदी, इंग्रजी, रशियन, स्पॅनिश यांसारख्या भाषांना सपोर्ट करेल.
तसेच WhatsApp ग्रुपमधील नवीन मेंबर्सना ग्रुपच्या संदर्भातील माहिती दिसणार आहे. त्यामुळे मेंबरला त्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचं की नाही हे ठरवणे सोपे होईल. या माहितीसह ग्रुप एक्झिटसाठी शॉर्टकट बटण देखील दिसेल.