नवी दिल्ली : देशभरात आजपासून टेलिकॉम अॅक्ट अर्थात दूरसंचार विधेयक लागू केले जात आहे. त्यानुसार, आजपासून कायद्यातील कलम 1, 2, 10 ते 30, 42 ते 44, 46, 47, 50 ते 58, 61 आणि 62 मधील तरतुदीही लागू होणार आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास तुरुंगातही जावं लागू शकतं.
केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा गुन्हे रोखण्याच्या आधारावर सरकार दूरसंचार सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय सिमकार्डबाबतही या कायद्यात कडक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसारच, आजपासून दूरसंचार कायदा 2023 अंशतः लागू होत आहे. म्हणजेच या कायद्यातील काही कलमांचे नियम हे आजपासून लागू केले जाणार आहेत.
दूरसंचार कायदा 2023, सध्याचा भारतीय टेलिग्राफ कायदा (1885), वायरलेस टेलिग्राफी कायदा (1933) आणि टेलिग्राफ वायर (बेकायदेशीर भोगवटा) कायदा (1950) च्या जुन्या नियामक फ्रेमवर्कची जागा घेणार आहे. आजपासून कायद्यातील कलम 1, 2, 10 ते 30, 42 ते 44, 46, 47, 50 ते 58, 61 आणि 62 मधील तरतुदीही लागू होणार आहेत. यातील नियमांचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.