नवी दिल्ली : सध्या WhatsApp, Facebook, X यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यातच जगभरात WhatsApp युजर्सची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळेच कंपनीकडूनही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणले जात आहे.
असे असताना आता WhatsApp मध्ये एक भन्नाट फीचर येत आहे. याच्या माध्यमातून युजर्सची चांगलीच पंचाईत होणार आहे. कंपनीने हे फीचर आणल्यानंतर WhatsApp युजर्स स्कॅमपासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहू शकणार आहेत. WhatsApp एका फीचरवर काम करत आहे ज्यानंतर अज्ञात नंबरवरून येणारे कॉल आपोआप ब्लॉक होतील. सध्या WhatsApp च्या या फीचरची बीटा चाचणी सुरू असून, लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल. नवीन फीचर WhatsApp च्या अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.24.20.16 वर दिसणार आहे.
नवीन अपडेटनंतर युजर्सकडे एक पर्याय असेल ज्याच्या मदतीने ते अज्ञात नंबरवरून येणारे कॉल किंवा मेसेज ब्लॉक करू शकतील. ॲपची सेटिंग्ज बदलल्यानंतर, अज्ञात नंबरवरून येणारे मेसेज आणि कॉल्स आपोआप ब्लॉक होतील, असे सध्या सांगितले जात आहे.