नवी दिल्ली : सध्या Apple च्या iPhone ला चांगलीच मागणी आहे. त्यात तांत्रिक बिघाडामुळे टेक कंपनी Apple ने iPhone 14 Plus मॉडेल परत मागवले आहेत. कंपनीच्या या रिकॉलमध्ये 10 एप्रिल 2023 ते 28 एप्रिल 2024 दरम्यान विकले गेलेल्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. असे जरी असले तरी कंपनीने सदोष असलेल्या स्मार्टफोनची संख्या उघड केलेली नाही.
Apple ने सांगितले की, ‘iPhone 14 Plus च्या मागील कॅमेरामध्ये एक बिघाड झाल्याचे आढळून आले आहे. मॉडेलच्या डिस्प्लेवर बॅक कॅमेरात बिघाड दिसत आहे. यामुळे फोटो काढण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात अडचण येऊ शकते. या प्रॉब्लेमचा सोल्यूशन करण्यासाठी एक नवीन सर्व्हिस प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांनी रिपेअर सर्व्हिस घेण्यापूर्वी त्यांच्या डिव्हाईसचा iCloud किंवा संगणकावर बॅकअप घ्यावा.
यापूर्वी 2021 मध्ये, Apple ने iPhone 12 च्या इअरपीस स्पीकरमध्ये खराबीमुळे सर्व्हिस प्रोग्राम सुरू केला होता. फोन दुरुस्त करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. तुमच्याकडे iPhone 14 Plus मॉडेल ज्यामध्ये बिघाड असेल तर तुम्ही Apple च्या वेबसाईटवर त्याचा क्रमांक टाकून सर्व्हिससाठी तुमची एलिजिबिलीटी तपासू शकता, असेही सांगण्यात आले आहे.