चांगले फोटो अथवा व्हिडिओ यावेत म्हणून अनेकजण महागड्या फोनला पसंती देतात. त्यानुसार, त्यांचे चांगले फोटो येतातही. जर तुम्ही फोटोसाठी iPhone वापरत असाल तर अशी एक सेटिंग आहे ती केल्यास फोटोची गुणवत्ता अर्थात Clearity सुधारू शकते. iPhone 16 Pro आणि 16 Pro Max मध्ये अनेक विशेष असे फीचर्स आहेत.
iPhone च्या या दोन फोन्समध्ये अनेक जबरदस्त असे फीचर्स देण्यात आले आहेत. उत्तम कॅमेरा लेन्स आहेत, जे या दिवाळीत सर्वोत्तम फोटो क्लिक करण्यात मदत करतील. iPhone 16 Pro आणि 16 Pro Max मध्ये, युजर्सना उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओग्राफीचा अनुभव देण्यासाठी झिरो लॅग शटर मिळत आहे. यात शक्तिशाली 48MP फ्यूजन, 5X टेलीफोटो आणि 48MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. 120fps वर 4K मध्ये खास क्षण कॅप्चर करण्यासाठी iPhone 16 Pro/Pro Max वापरा. तुम्ही व्हिडिओसाठी सिनेमॅटिक मोड वापरू शकता जेणेकरून तुम्ही फोकस डायनॅमिकपणे बदलू शकता.
iPhone 16 Pro मध्ये युजर्सना कॅमेरा कंट्रोल्सचाही सपोर्ट मिळतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोटोंना सर्वोत्तम टच देऊ शकता. iPhone 16 Pro आणि 16 Pro Max मध्ये यूजर्सना फोटो आणि व्हिडिओंना नवीन टच देण्याची सुविधा मिळेल. तसेच युजर्स 120fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतील. व्हिडिओ कॅप्चर केल्यानंतर, युजर्सना ते स्लो करता येणार आहे. जेणेकरून ते फटाक्यांचे काही विशेष क्षण सहजपणे पाहू शकतील.