नवी दिल्ली : सध्या जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्लॅन महाग केले आहेत. काही महिन्यांपूर्वी Jio, Airtel आणि Vodafone Idea ने आपले सर्व प्लॅन महाग केले होते. कंपन्यांच्या या पावलानंतर त्यांचे प्लॅन्स सुमारे 600 रुपयांनी महागले आहेत, त्यानंतर मोबाईल युजर्सच्या अडचणी वाढल्या असून, आर्थिक फटकाही बसत आहे.
या कंपन्यांच्या बहुतेक प्लॅन्स फक्त 28 दिवसांसाठी असतात, पण काही प्लॅन्स एका महिन्याच्या वैधतेसह असतात, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. पण आम्ही तुम्हाला महिनाभराच्या पॅकची माहिती देणार आहोत. त्यात भारती एअरटेल अर्थात एअरटेलचा 379 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनसह, सर्व नेटवर्कवर अमर्यादित 5G आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 31 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
व्होडाफोन आयडिया अर्थात Vi चा मासिक प्लॅन 218 रुपये आहे. अमर्यादित कॉलिंगशिवाय एकूण 3GB डेटा आणि 300 SMS उपलब्ध आहेत. तसेच रिलायन्स जिओचा 319 रुपयांचा प्लॅन आहे ज्याची वैधता एक महिन्याची आहे म्हणजेच जर तुम्ही 1 तारखेला रिचार्ज केले असेल तर तुम्हाला पुढील महिन्याच्या 1 तारखेलाच रिचार्ज करावे लागेल.
यामध्ये तुम्हाला 31 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय, 100 एसएमएस दररोज आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहेत.