नवी दिल्ली : चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन परत मिळणे जवळपास कठीणच असतं. पण अशा काही ट्रिक्स आहेत त्या फॉलो केल्यास तुम्हाला तुमचा चोरीला झालेला फोन जरी बंद असला तरी तो सापडू शकतो. मात्र, तुम्हाला त्यासाठी तुमच्या फोनमध्ये एक विशेष सेटिंग करणे गरजेचे आहे.
प्रसिद्ध कंपनी अॅपलकडून आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. या माध्यमातून जर तुमचा iPhone चोरी झाला किंवा हरवला असला आणि तो कोणी लगेच बंद केला तरीही शोधणे सोपे होणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या iPhone मधील सेटिंग आधीच सुरु करणे गरजेचे आहे.
Find My Device करेल काम
iPhone मध्ये ‘Find My Device’ ॲप आहे. त्याची सेटिंग काळजीपूर्वक करा. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जा. येथे तुमच्या नावावर क्लिक करा आणि नंतर ‘Find My Device’ पर्यायावर क्लिक करा. येथून तुम्ही तुमचे लोकेशन कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करू शकता. फोन कधी ऑफलाईन झाला हे पाहण्यासाठी तुम्हाला ‘Find My Network’चा पर्याय चालू करावा लागेल.
त्याचबरोबर अँड्रॉईड युजर्सना त्यांचा हरवलेला फोन शोधण्यासाठी ‘Find My Device’ वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला त्याच अकाउंटने लॉग-इन करावे लागेल ज्याद्वारे तुम्ही हरवलेल्या फोनमध्ये लॉग-इन केले आहे. येथून तुम्ही तुमच्या फोनचे शेवटचे लोकेशन पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोन देखील ट्रॅक करू शकता.