मुंबई : प्रसिद्ध विमान कंपनी स्पाईसजेटने आपल्या नफ्याची माहिती दिली आहे. एअरलाईन स्पाईसजेटने जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 20 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत हा नफा 158 कोटी रुपये होता. पण आता त्यामध्ये घट झाल्याचे दिसत आहे.
मागील वर्षीच्या याच तिमाहीतील 2,003 कोटींवरून कंपनीच्या ऑपरेशन्समधून जून तिमाहीत 15 टक्क्यांची घट होऊन ती 1,708 कोटी झाली आहे. मार्च तिमाहीच्या तुलनेत, कंपनीच्या करानंतरच्या नफ्यात 24 टक्के वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 127 कोटी रुपये होता.
दरम्यान, देशाच्या विमान वाहतूक उद्योगाला अलीकडच्या काळात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्पाईसजेटने पहिल्या तिमाहीत 393 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा कमावला आहे. असे असले तरी गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 198 कोटी रुपये होता.