नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे कंपन्यांकडूनही आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फिचर्स आणले जात आहे. त्यात आता एक असे अॅप आहे ते आत्तापर्यंत 50 कोटी स्मार्टफोन युजर्सने डाऊनलोड केले आहे. तुम्हीही डाऊनलोड करा, कारण हे तुम्हाला भविष्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
Find My Device असे या अॅपचे नाव आहे. Google ने 2013 मध्ये हे ॲप लाँच केले. ॲपलमध्येही अशा प्रकारचे ॲप आहे. Find My Device हे स्मार्टफोन युजर्ससाठी अतिशय उपयुक्त ॲप आहे, तुम्ही ते वेब वर्जनवर देखील वापरू शकता. 11 वर्षात या गुगल ॲपच्या म्हणजेच Find My Device च्या डाउनलोडची संख्या 500 दशलक्ष म्हणजेच 50 कोटींच्या पुढे गेली आहे.
Find My Device ॲप म्हणजे काय आणि ते कसे वापरावे?
Find My Device ॲप हे डिव्हाइस ट्रॅकिंग ॲप आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही तुमचा फोन थेट ट्रॅक करू शकता. इतकेच नाहीतर तुम्ही Find My Device च्या मदतीने दूर असून, फोन सायलेंट किंवा रिंग करू शकता.
हरवलेला फोन येऊ शकतो शोधता?
Find My Device च्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन शोधू शकता आणि लॉक देखील करू शकता. तुम्ही google.com/android/find वर जाऊन Find My Device देखील वापरू शकता. Find My Device च्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनच्या बॅटरीची स्थिती लांब असून देखील तपासू शकता.