नवी दिल्ली : सध्या आपल्याला कोणतेही व्हिडिओ पाहायचे असल्यास युट्यूबला प्राधान्य देतो. युट्यूबकडून अनेक व्हिडिओ अगदी सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंपनीकडूनही त्यानुसार बरेचसे फीचर्स आणले जात आहे. असे असताना आता युट्यूबने आपल्या साईटवर नवीन Sleep Timer विषयी माहिती दिली आहे.
या फीचरबाबत कंपनीने म्हटले आहे की, आता तुम्ही व्हिडिओचा प्लेबॅक वेळ स्वत: ठरवू शकता. त्यानंतर तुम्ही ठरवलेल्या वेळी व्हिडिओ आपोआप पॉज होईल. YouTube एका नवीन फीचरवर काम करत आहे जे Sleep Timer आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर व्हिडिओ प्लेबॅक एका ठराविक वेळेत थांबेल. सध्या हे फक्त काही युजर्ससाठी म्हणजेच बीटा युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
YouTube चे हे Sleep Timer फीचर प्रीमियम यूजर्ससाठी लाँच केले जाणार असल्याचे सांगितले आहे. Sleep Timer फीचरसाठी AI ची मदत घेतली जाणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना एक सेटिंग करावी लागेल.
सेटिंगसाठी, स्मार्टफोन किंवा वेब व्हर्जनवरील सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल आणि व्हिडिओ इंटरफेस आयकॉनवर टॅप करून सेटिंग्ज बनवू शकतात. Sleep Timer साठी, 10, 15, 20, 30, 45 आणि 60 मिनिटांचे Timer उपलब्ध असतील.