नवी दिल्ली : डिसेंबरचा महिना सुरु झाला आहे. त्यात आता 2024 हे वर्ष संपणार आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी अनेक कंपन्यांकडून स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली जात आहे. Redmi पासून OnePlus पर्यंत अनेक फोन्स होणार डिसेंबरमध्ये लाँच केले जाणार आहेत. iQOO 13 आणि Redmi Note 14 यांसह अनेक फोन्स आणले जाणार आहेत.
iQOO 13 लाँच केला जाणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचसंदर्भातील सर्व माहिती आता शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असला तरी भारतात तो 3 डिसेंबरला लाँच होणार आहे. यामध्ये तुम्हाला Snapdragon 8 Elite प्रोसेसर, स्टायलिश ॲल्युमिनियम फ्रेम, ग्लासी पॅनल, IP69 रेटिंग आणि इतर दमदार फीचर्स मिळतील. स्मार्टफोनचा मागील पॅनल RGB LED लाईट्ससह मिळणार आहे. Redmi Note 14 सीरीज देखील लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे.
कंपनीकडून हा स्मार्टफोन 9 डिसेंबर रोजी केली जाणार आहे. ज्यामध्ये तीन स्मार्टफोन समाविष्ट असणार आहे. Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+. डिव्हाइसेस 6.67-इंचाच्या OLED डिस्प्लेसह येतील, जे 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहेत. सध्या या स्मार्टफोन्समध्ये अनेक बेस्ट असे फीचर्सही देण्यात आले आहेत.