नवी दिल्ली : सध्या Google चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. Google वर काही शोधूनही तुमचा कॉम्प्युटर हॅक होऊ शकतो, असा विचार तुम्ही कधी केला का? पण हे घडू शकते हे खरे आहे. एका सायबर सुरक्षा कंपनीने याबाबत इशारा दिला आहे.
सायबर सिक्युरिटी एजन्सी सोफोसच्या टीमने लोकांना या हॅकिंगबाबत सावध केले आहे.
Sophos च्या मते, “GootLoader विशिष्ट मांजरींसाठी सर्च रिझल्ट आणि विशिष्ट ठिकाणाबद्दल माहिती वापरून मालवेअर शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. रिपोर्टनुसार, जर तुम्ही गुगलवर Are Bengal Cats legal in Australia? आपण शोधल्यास, आपला कॉम्प्युटर हॅक होऊ शकतो आणि हॅकर्स त्याचा ताबा घेऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
याबाबतचा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. Are Bengal Cats legal in Australia? हे वाक्य जरी टाकले तरी तुम्ही सायबर हल्ल्याचे बळी पडू शकता, असेही सांगितले गेले आहे.