नवी दिल्ली : आपण काहीजरी ऑनलाईन शोधायचं म्हटलं की Google Search करत असतो. पण तुम्हाला माहितीये का Google चे काही टूल्स आहेत, ज्याच्या मदतीने मोबाईलमधील ब्राउझरचा अनुभव सुधारला जाऊ शकतो. यामध्ये व्हॉईस कमांडपासून हँडरायटिंग ओळखपर्यंतच्या साधनांचाही समावेश आहे.
Google आपल्या युजर्सना शोधण्यासाठी अनेक पर्याय देत आहे. गुगल युजर्सना मोबाईलमध्ये व्हॉईस सर्च फीचर देते. या माध्यमातून युजर्स फक्त बोलून काहीही शोधू शकतील. यासाठी तुम्हाला फक्त Hey Google म्हणावे लागेल. यानंतर तुम्ही गुगल असिस्टन्सला कोणत्याही गोष्टीबद्दल कोणताही प्रश्न विचारू शकता. या फीचरच्या मदतीने युजर्सना बोटांनी टाईप करण्याची गरज भासणार नाही.
तसेच तुम्ही Circle to Search फीचरबद्दल ऐकले किंवा वाचले असेल. यामध्ये युजर्सना कोणत्याही विषयावर किंवा वस्तूवर वर्तुळ काढायचे आहे. यानंतर शोध आपोआप होईल. हे फिचर सध्या फार कमी फोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये गुगल आणि सॅमसंगच्या फोनचा समावेश आहे. नंतर सर्वच फोनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.