नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Samsung ने नुकताच Galaxy F55 स्मार्टफोन भारतात लाँच केला. या स्मार्टफोनला ग्राहकांचीही चांगलीच पसंती मिळत आहे. असे असताना आता कंपनीने Galaxy F54 या स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 MP चा कॅमेरा देण्यात आला असून, हा बेस्ट फिचर ठरत आहे.
ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करणं परवडण्यासाठी कंपनीने आता दुसऱ्यांदा त्याच्या किंमतीमध्ये कपात केली आहे. Samsung च्या Galaxy F54 या स्मार्टफोनमध्ये 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हे ऑक्टा-कोर Exynos 1380 चिपसेटसह येते. फोन 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज यामध्ये मिळत आहे. मात्र, हा फोन 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमसह 16GB रॅमला सपोर्ट करतो.
जून 2023 मध्ये लाँच झालेल्या Samsung Galaxy F54 च्या किमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये स्मार्टफोनच्या किमतीत प्रथमच घट झाली. या वर्षाच्या सुरुवातीला Galaxy F55 ची किंमत 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्यानंतर हा Galaxy F54 स्मार्टफोन 24,999 रुपयांना विकला जात होता. आता कंपनीने स्मार्टफोनची किंमत आणखी 2,000 रुपयांनी कमी केली आहे.