नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Samsung ने आपला नवा Galaxy Book 4 Ultra लॅपटॉप लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक बेस्ट असे फिचर्स आहेत. यातील विशेष बाब म्हणजे हा लॅपटॉप सामान्य लॅपटॉपसारखा नसून हा एक टचस्क्रीन लॅपटॉप आहे. त्यात 16 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.
Intel Core Ultra 9 किंवा Core Ultra 7 चिपसेटसह हा लॅपटॉप घेता येऊ शकणार आहे. यामध्ये तुम्हाला GPU, RTX 4070 किंवा RTX 4050 चे दोन पर्यायदेखील मिळतात. हा लॅपटॉप 16 इंच डिस्प्लेसह येतो. यात 880×1800 पिक्सेल रिझोल्यूशन, 16:10 आस्पेक्ट रेशो आणि 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळत आहे. यामध्ये 32GB पर्यंत रॅम आणि दमदार अशी बॅटरी देण्यात आली असून, त्याचा बॅकअपही चांगला मिळतो.
Samsung चा हा लॅपटॉप 32 GB रॅममध्येही उपलब्ध आहे. बेस व्हर्जनमध्ये 16 GB रॅम असून, दोन्ही प्रकारांमध्ये 1TB SSD स्टोरेज आहे. ऑडिओसाठी, यात AKG चा क्वाड स्पीकर सेटअप आहे, जो डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतो. यात 2 मेगापिक्सेल वेबकॅम आणि अंकीय कीसह बॅकलिट कीबोर्ड आहे.
यात 76Wh बॅटरी आहे, जी USB टाईप-सी पोर्टद्वारे चार्ज होते. त्याचे वजन फक्त 1.86 किलो आहे. हा लॅपटॉप तुम्हाला 1,08,990 रूपयांमध्ये ऑनलाईन खरेदी करता येऊ शकतो.