नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपले दोन नवीन टॅब्लेट लाँच केले आहेत. ज्यात Samsung Galaxy Tab S10+ आणि Galaxy Tab S10 Ultra यांचा समावेश आहे. हे टॅब आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात AI साठी विशेषतः डिझाईन केलेले हे पहिले टॅब्लेट आहेत.
Samsung Galaxy Tab S10+ (Wi-Fi) या टॅबची सुरुवातीची किंमत 90,999 रुपये आहे. या किंमतीत तुम्हाला 12GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळणार आहे. 5G सह हेच मॉडेल 1,04,999 रुपयांना उपलब्ध असेल. 12GB + 256GB स्टोरेजसह Galaxy Tab S10 Ultra (Wi-Fi) ची किंमत 1,08,999 रुपये आणि 512GB स्टोरेजची किंमत 1,19,999 रुपये आहे. या स्टोरेजमधील 5G मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे 1,22,999 रुपये आणि 1,33,999 रुपये आहेत. दोन्ही टॅबसह 45W अडॅप्टर विनामूल्य उपलब्ध असेल.
Samsung Galaxy Tab S10+ मध्ये 2800×1752 पिक्सेल रिझोल्यूशनसह 12.4-इंचाचा डिस्प्ले आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आहे आणि दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.