नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यातच आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने आपला नवा फोन लाँच केला आहे. Samsung ने Galaxy M05 हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यातील सर्वात चांगली बाब म्हणजे यामध्ये 50MP देण्यात आला आहे.
Samsung चा एक नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन MediaTek Helio G85 SoC सह येत आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजही देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो) सह 6.74-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) PLS LCD डिस्प्ले आहे. याशिवाय, यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 SoC देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो. सॅमसंगच्या रॅम प्लस वैशिष्ट्यासह व्हर्च्युअल रॅम 8GB पर्यंत वाढवता येते. यामध्ये 50 MP प्रायमरी कॅमेरा (f/1.8 अपर्चर) आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा (f/2.4 अपर्चर) सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
तसेच सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा (f/2.0 अपर्चर) समोर देण्यात आला आहे. चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी 5000mAh ची दमदार बॅटरीही मिळत आहे.