नवी दिल्ली : सध्या अनेक वस्तू स्मार्ट होताना दिसत आहेत. त्यात स्मार्टफोन असो वा स्मार्टवॉच ग्राहकांची पसंतीही वाढत आहे. आता प्रसिद्ध कंपनी Rogbid ने आपले नवे स्मार्टवॉच लाँच केले आहे. यामध्ये 4G कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून, यातून सिमकार्डचा सपोर्टही मिळत आहे.
या स्मार्टवॉचमध्ये प्रीमियम मेटालिक डिझाईन देण्यात आले आहे. त्याचबरोबर 1.85- इंचाचा राउंड HD डिस्प्ले (400 x 400 पिक्सल) रिजॉल्यूशन आणि 98 टक्के RGB कलर गॅमटसह देण्यात आला आहे. यात 2MP चा कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी IP67 सर्टिफिकेशनसह आला आहे.
तसेच सिम कार्डचा सपोर्ट देखील मिळतो. या डिव्हाईसमध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि बिल्ट-इन जीपीएसचा समावेश देखील आहे. यात उजवीकडे दोन फिजिकल बटणसह एक प्रीमियम मेटालिक डिझाईनही आहे. ज्यात फोटो, व्हिडिओ आणि क्यूआर कोड स्कॅनिंगसाठी 2- मेगापिक्सलचा कॅमेरा देखील आहे.
या स्मार्टवॉचमध्ये गोल डायल मिळतो, ज्यात 1.85-इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 400 x 400 रिजॉल्यूशन आणि 98% आरजीबी कलर गॅमटला सपोर्ट करतो. स्टोरेजसह क्वॉड-कोर प्रोसेसरवर हे स्मार्टवॉच चालते. यात Android 8.1 ऑपरेटिंग सिस्टिम मिळत आहे.