नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi ने आपला नवा Redmi Turbo 3 लवकरच लाँच करणार असल्याची घोषणा केली. हा फोन सुरुवातीला चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. यात अनेक विशेष असे फिचर्स देण्यात आले असून, त्याचे डिझाईनही आकर्षक असे करण्यात आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना नक्की पसंत पडेल, अशी कंपनीला आशा आहे.
Redmi Turbo 3 चीनमध्ये लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. फोनची प्रमुख वैशिष्ट्य आणि डिझाईन डिटेल्स ऑनलाईन लीक झाली आहेत. आता, कंपनीने अधिकृतपणे फोनचे नाव आणि रिलीज डेटची माहिती दिली आहे. हा फोन Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरवर चालेल. हा फोन 7.8mm जाड असेल आणि 179g वजनाचा असेल आणि यामध्ये 16GB RAM आणि 1TB स्टोरेज असणार आहे. Xiaomi च्या HyperOS प्री-इंस्टॉलसह देखील येईल.
Redmi चा Turbo 3 हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि गोल्डन कलरमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरा लेन्स आणि रिंग-आकाराचा फ्लॅशही असणार आहे. हा स्मार्टफोन दोन दिवसांत म्हणजेच 10 एप्रिलला लाँच केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.