नवी दिल्ली : रेडमी या कंपनीने आपले दोन लॅपटॉप्स लाँच केले आहेत. रेडमी बुक 16 2024 आणि रेडमी बुक 14 2024 हे लॅपटॉप लाँच झाले आहेत. हे मॉडेल्स रेडमी के 70 सीरीज, रेडमी वॉच 4 आणि बड्स 5 प्रोसह लाँच करण्यात आले आहेत. हे लॅपटॉप्स 13th Gen Intel Core i5-13500H चिपसेटसह मिळत आहेत.
या लॅपटॉपसोबत Intel Iris Xe ग्राफिक्स कार्ड देण्यात आले आहे. तसेच 16 GB RAM आणि 1 TB पर्यंतची स्टोरेज दिली जात आहे. ऑडियोसाठी यामध्ये ड्युअल 2W स्पिकर्स देण्यात आले आहेत, ज्यात Dolby Atmos चा सपोर्टही मिळतो.
जाणून घ्या या लॅपटॉपचे फिचर्स…
रेडमी बुक 14 2024 मॉडेलमध्ये 14 इंचाचा 2.8 K डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2880 x 1800 पिक्सल रिजोल्यूशन आणि 300 नीटस ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा लॅपटॉप 13th Gen Intel Core 15-13500H प्रोसेसरसह मिळत आहे. सोबत Intel Iris Xe ग्राफिक्स, 16 GB RAM आणि 1 TB स्टोरेज देण्यात आली आहे. हा मॉडेल विंडोज 11 वर चालतो. या लॅपटॉपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी 1080 पी वेबकॅम देण्यात आला आहे.
ऑडिओसाठी यामध्ये 2 वॉट स्पिकर्स मिळतात, ज्या Dolby Atmos चा सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.2 व 3.5 मिमी हेडफोन जॅक देण्यात आला आहे. या लॅपटॉपची बॅटरी 56Wh ची असून, सोबतच 100W GaN फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.