नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन बाजारात आहेत. त्याच्या किमतीनुसार, फिचर्सही सर्वोत्तम दिले जात आहेत. पण जर 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आपल्याला 10 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळणे अवघडच आहे. मात्र, आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme आपला नवा 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Realme C65 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून, हा स्मार्टफोन 5G तर आहेच पण याची किंमत दहा हजार रुपयांपेक्षाही कमी असणार आहे. Realme C65 मध्ये अनेक विशेष असे फिचर्स देण्यात आले आहेत. Jio आणि Airtel च्या सहकार्याने मोफत अमर्यादित 5G चा लाभही घेता येणार आहे. Realme चा हा एक बजेट फोन आहे.
Realme चा हा फोन भारतात 26 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. हा फोन जगातील पहिला MediaTek डायमेंशन 6300 चिपसेट आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल.
तसेच Realme C65 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनचे वजन 185 ग्रॅम असेल. फोनमध्ये 500 nits पीक ब्राइटनेस देण्यात येईल. हा फोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर काम करेल. त्यात उत्तम बॅटरी बॅकअपही मिळणार आहे.