नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. त्यानुसार, ग्राहकांकडून स्मार्टफोनला पसंतीही दिली जात आहे. पण, चांगले फिचर्स हवे असतील तर स्मार्टफोनच्या किमती वाढतात. मात्र, प्रसिद्ध कंपनी Realme ने आपले दोन स्वस्तातील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यात दमदार बॅटरी देण्यात आली असून, त्यातून बॅकअपही चांगला मिळणार आहे.
Realme V60 आणि Realme V60s हे दोन फोन्स चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. हे एंट्री लेव्हल फोन आहेत. यामध्ये खूप समान वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असून, 8 GB पर्यंत रॅम आहे. सिंगल 32-रियर कॅमेरासह 5000mAh बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. तसेच फास्ट चार्जिंगसाठी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
Realme V60 ची किंमत 6GB + 128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी CNY 1,199 (अंदाजे 13,800) पासून सुरू होते. तर 8GB + 256GB व्हेरिएंटमध्ये देखील स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत CNY 1,399 (अंदाजे 16,010 रुपये) असणार आहे. तर Realme V60s या स्मार्टफोनची किंमत CNY 1,399 (अंदाजे रु. 16,100) पासून सुरू होते. तर 8GB+256GB मॉडेलची किंमत CNY 1,799 (अंदाजे रु. 20,700) आहे.
Realme V60 आणि Realme V60s हे दोन्ही ड्युअल सिम स्मार्टफोन आहेत जे Android 14 वर Realme UI 5 वर चालतात. यात 6.67-इंचाची HD+ (720×1,604 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे.