नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपला नवा Realme 12X स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. Realme चा हा नवीन फोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो आणि यामध्ये 50MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरसह LCD डिस्प्ले देखील आहे.
Realme 12X स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असून, हा स्मार्टफोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो आणि 120Hz रिफ्रेश रेट आणि 625 nits पीक ब्राइटनेससह 6.67-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत RAM सह Octa-Core 6nm MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर मिळू शकतो. व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्याद्वारे रॅम 24GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
Realme 12X ची किंमत 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी अंदाजे 16,000 रुपये असेल तर त्याच्या 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत अंदाजे 18,000 रुपये असू शकते. चीनमध्ये त्याची विक्री सुरू झाली असून, हा फोन काळ्या आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.