सध्या बहुतांश लोक स्मार्टफोनचा वापर करतात. या स्मार्टफोनचा फायदाही तसा मोठा आहे. पण हा फोन वापरताना काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. तुमच्या फोनमधील व्हायरसही याचं कारण असू शकतं. त्यामुळे फोनमध्ये व्हायरस राहू नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
फोनमधील व्हायरस ओळखून त्याला लवकर बाहेर काढले पाहिजे. अन्यथा या व्हायरसमुळे तुम्हाला फटका बसू शकतो. अनेक व्हायरस असे देखील आहेत, जे तुमच्या फोनवर अॅप किंवा मेसेजद्वारे येतात आणि तुम्हाला हे माहीत देखील नसतं. हे व्हायरस तुमचा डेटादेखील चोरू शकतात. तुमच्या फोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे आता शोधणे सोपं झालं आहे.
जर तुमच्या स्मार्टफोनची प्रोसेसिंग स्पीड खूप मंद असेल तर ते व्हायरसमुळे देखील होऊ शकते. पैसे कमवण्यासाठी तुमच्या फोनवर मेसेज, कॉल किंवा त्याच्या जाहिराती वारंवार दिसत असतील तर तुमच्या फोनमध्ये व्हायरस असू शकतो. तुमच्या फोनवर अनेक जाहिराती आल्या तर तो व्हायरस असू शकतो.
स्पॅम मेसेज पाठवण्यासाठी मालवेअर आणि ट्रोजन आपला स्मार्टफोन वापरू शकतात. मालवेअर आणि व्हायरस आपल्या स्मार्टफोनवर नवीन अॅप्स डाउनलोड करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.