नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Poco ने आपला नवीन आणि पहिला टॅबलेट लाँच केला आहे. या टॅबलेटचे नाव Poco Pad 5G असून, या टॅबलेटमध्ये 12.1 इंच डिस्प्लेसह अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहे. हा टॅबलेट 1.5K IPS LCD डिस्प्लेसह मिळत आहे.
Poco Pad मध्ये Snapdragon 7s Gen2 चिपसेट आहे. या टॅबमध्ये 8GB पर्यंत मानक LPDDR4X RAM आणि 128/256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आला आहे. याची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डने वाढवता येऊ शकते. हा टॅब Android 14 वर कार्यरत असून, HyperOS वर चालतो. या टॅबलेटमध्ये 33W चार्जिंग सपोर्टसह 10000 mAh ची मोठी बॅटरी आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP चा कॅमेरा असून, हा टॅब फक्त 7.5 मिमीचा आहे.
हा टॅब पूर्ण चार्ज केल्यावर 17 तास रिडिंग आणि 16 तास एचडी व्हिडिओ प्लेबॅकसह येतो, असा कंपनीचा दावा आहे. हा टॅब डस्ट आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून संरक्षित राहण्यासाठी IP52 रेटिंगसह येतो. या टॅबलेटमध्ये स्टायलस आणि कीपॅडसारख्या अॅक्सेसरीजही मिळत आहेत.