नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. असे असताना आता Google ने Google Pixel 9 सीरिज लाँच केली आहे, ज्या अंतर्गत चार नवीन Pixel फोन आणले गेले आहेत. ज्यात Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Google Pixel 9 Pro Fold यांचा समावेश आहे. हे फोन लाँच केल्यामुळे कंपनीने भारतीय बाजारात Pixel 8 स्वस्त केला आहे.
Google Pixel 8 या स्मार्टफोनवर सध्या मोठी सवलत दिली जात आहे. Pixel 8 चा 128 GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 58,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, तर आधी त्याची किंमत 75,999 रुपये होती. याशिवाय बँक ऑफर अंतर्गत या फोनवर 4,000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. Google Pixel 8 मध्ये 6.2 इंचाच्या Actua डिस्प्लेसह इतर अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. यात 120 Hz चा रीफ्रेश रेट आणि 2000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसही आहे.
Pixel 8 मध्ये ग्लास फिनिश डिझाईन आहे. Pixel 8 चा कॅमेराही चांगला आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा असून, त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 MP तर सेकंडरी कॅमेरा 12 MP चा असून, यात अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. समोर सेल्फीसाठी 10.5 MP सेन्सरही देण्यात आला आहे. फोनमध्ये 4575mAh बॅटरी आहे आणि 27W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टही आहे.