मुंबई : लाखो लोक दररोज व्हॉट्सॲप वापरतात. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे बरेच फायदे आहेत परंतु त्यात काही कमतरता देखील आहेत. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना अनोळखी व्यक्तीशी चॅट करण्यासाठीही नंबर शेअर करावा लागतो. आता ही समस्या दूर करण्याचे कंपनीकडून प्रयत्न सुरु करण्यात आलेत.
व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे लोकांना त्यांचा फोन नंबर न सांगता चॅट करता येईल. रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप यूजर्स लवकरच या फीचरचा वापर करू शकतील. या फिचरचा वापर करुन युजर्स एक युनिक असं युजरनेम तयार करु शकतील. ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोफाईलबाबत अधिक गोपनीयता बाळगता येईल.
तसेच युजर्सना त्यांचा फोन नंबर देखील लपवता येणार आहे आणि फोन नंबर न दाखवता देखील युजर्सना चॅट करता येणार आहे. अँड्रॉइड आणि वेब यूजर्सना लवकरच या फिचरचा वापर करता येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. हे फीचर आणल्यानंतर युजर्स युनिक युजरनेमच्या मदतीने इतरांनाही सर्च करू शकतील. हे इनस्टाग्राम सारख होईल. यासाठी त्यांना सर्च बारमध्ये जाऊन युजरनेम सर्च करावे लागेल. यामुळे फोन नंबर शेअर करणे ही गोष्ट पूर्णपणे बंद करण्यात येईल.