नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी OnePlus ने अलीकडेच 13 सीरीजचे स्मार्टफोन्स मार्केटमध्ये आणले आहेत. यापूर्वी कंपनीने 13 सीरीजचे 2 स्मार्टफोन आणले होते. OnePlus 13 आणि OnePlus 13R असे हे स्मार्टफोन होते. आता आणखी एक फोन लाँच केला जात आहे.
OnePlus 13T असे या स्मार्टफोनचे नाव आहे. OnePlus ने 10T पासून कोणताही ‘T’ सीरीजचा स्मार्टफोन लॉन्च केलेला नाही. आता, OnePlus 13T 5G लवकरच बाजारात येणार आहे. अनेक यूजर्सनी या फोनला OnePlus 13 Mini असे नाव दिले आहे. OnePlus 13T चे स्पेसिफिकेशन्स देखील ऑनलाईन पाहिला मिळत आहे. OnePlus 13T च्या फोनमध्ये 6.3 इंचाची स्क्रीन आणि 6200 mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकणार आहे.
OnePlus 13 मध्ये 6.82 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर OnePlus 13T या फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग उपलब्ध होऊ शकते. हा फोन 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करेल जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. OnePlus 13T 5G यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आहे. तसेच, फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असेल जो OIS सह येतो. यात 50MP टेलिफोटो सेन्सर असणार आहे, जो 2X ऑप्टिकल झूमसह येतो. हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.