नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी OnePlus लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने OnePlus 13 स्मार्टफोन चीनच्या मार्केटमध्ये लाँच केला आहे. त्यानंतर आता हा फोन लवकरच जागतिक बाजारपेठेसोबत भारतातही लाँच केला जाणार आहे. कंपनीने या फोनच्या लाँचची निश्चित तारीख जरी सांगितली नसली. तरी हा फोन जानेवारीमध्ये लाँच केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
तुम्हाला पुढील वर्षाच्या सुरुवातीला OnePlus 13 मिळेल. OnePlus च्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त हा फोन भारतात लाँच केला जाईल. 10 वर्षांपूर्वी OnePlus ने OnePlus One च्या माध्यमातून भारतीय मार्केटमध्ये एंट्री केली होती. OnePlus ने विशेष ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने या फोनचा टीझरही जारी केला आहे. या टीझरनुसार, OnePlus 13 मिडनाईट ओशन, ब्लॅक एक्लिप्स आणि आर्क्टिक डॉन कलर पर्यायांमध्ये लाँच केला जाईल, असे दिसत आहे.
कंपनी या फोनमध्ये मायक्रोफायबर व्हिजन लेदर टेक्सचर वापरणार आहे. हे टेक्सचर फक्त मिडनाईट ओशन कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. फोन IP68 + IP69 रेटिंगसह येईल. यासोबतच OnePlus ने ‘Board the OnePlus 13 Train and Win Big’ ही स्पर्धा देखील सुरू केली आहे. या स्पर्धेत भाग घेऊन तुम्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन, OnePlus चे नवीन ऑडिओ प्रोडक्ट्स आणि इतर प्रोडक्ट्स जिंकता येऊ शकतील.