नवी दिल्ली : सध्या युट्यूबचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कोणताही व्हिडिओ, शॉर्ट्स पाहायचे असल्यास युट्यूबला प्राधान्य दिलं जातं. त्यात आता लवकरच युट्यूबवर आवाजात कमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. लोक त्यांचा मूड व्यक्त करू शकतील आणि त्या आधारे त्यांना गाणी ऐकायला मिळू शकणार आहे.
YouTube ने काही आकडेवारी शेअर केली आहे. YouTube वर दररोज दोन कोटी व्हिडिओ अपलोड केले जातात, असा दावा केला जातो. यावर्षी YouTube वर अनेक नवीन फीचर्स येणार आहेत. यामध्ये व्हॉईस रिप्लाय खास असा असणार आहे. गेल्या वर्षी, हे फीचर निवडक प्रोड्यूसरसह टेस्ट घेण्यात आली. यावर्षी आणखी अनेक प्रोड्यूसरना हे फीचर मिळेल. कमेंट सेक्शनमध्ये व्हॉईस रिप्लाय देता येतील. Ask Music Feature लाँच करण्याची तयारी सुरु आहे.
याअंतर्गत, YouTube प्रीमियम आणि म्युझिक युजर्स त्यांच्या मूडबद्दल सांगू शकतील आणि त्यावर आधारित संगीत ऐकू शकतील. सुरुवातीला हे फीचर इंग्रजीमध्ये असेल. याशिवाय, टीव्हीवर YouTube पाहणाऱ्या युजर्सना लवकरच मल्टीव्ह्यूची सुविधा मिळेल. ते त्याच्या टीव्ही स्क्रीनवर एकाच वेळी वेगवेगळे कंटेंट पाहू शकेल.