नवी दिल्ली : इन्स्टाग्राम, फेसबुक, WhatsApp सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. त्यानुसार, कंपन्यांकडूनही नवनवे फिचर्स देण्याचा प्रयत्न असतो. त्यातच आता WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट असं फिचर आणत आहे. या माध्यमातून स्क्रीन शेअरिंग करता येणार आहे.
WhatsApp च्या नव्या फिचरच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलदरम्यानच स्क्रीन शेअरिंगचा पर्याय लवकरच मिळणार आहे. त्याची बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू करण्यात आली आहे. WhatsApp बीटा व्हर्जन 2.23.11.19 मध्ये या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. सध्या काही निवडक युजर्ससाठी हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अॅप कदाचित जुन्या अँड्रॉइड फोनवर चालणार नाही.
स्क्रीन शेअरिंगचा पर्याय वापरताना युजर्स जी माहिती शेअर करतील, ती व्हॉट्सअॅपदेखील अॅक्सेस करू शकेल. त्यात पासवर्ड, पेमेंट डिटेल, फोटो, मेसेज तसेच ऑडिओचा समावेश असणार आहे. त्यामुळे हा पर्याय वापरताना युजर्सला आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.