नवी दिल्ली : भारतीय रेल्वे एक सुपर ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक निवेदन जारी केले आहे. भारत सरकार एका सुपर ॲपवर काम करत आहे, ज्याद्वारे रेल्वेची अनेक कामे करता येतील. रेल्वेच्या सुपर ॲपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग ते रिअल टाईममध्ये ट्रेनचा स्टेटस पाहणे अशी अनेक कामे एकाच ॲपमधून केली जातील, असे सांगण्यात येत आहे.
या अॅपच्या माध्यमातून तिकिटे बुक करण्यास PNR Status तपासण्याची, ट्रेनचा Status घेण्यास आणि इतर सुविधा देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या ॲपवर एकूण 90 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, यासाठी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. CRIS द्वारे रेल्वेचे सुपर ॲप तयार केले जाणार असून, जे रेल्वेच्या आयटी विभागातून विकसित केले जात आहे. रेल्वे सुरक्षेबाबत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, ‘दहा वर्षांपूर्वी दरवर्षी 171 रेल्वे अपघात होत होते, जे आता सुमारे 40 वर आले आहेत’.
सर्व रेल्वेसेवा एकाच ठिकाणी असतील उपलब्ध
रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून काम केले जात आहे. सरकार गेल्या दशकापासून भारतीय रेल्वेला अत्याधुनिक बनविण्यावर भर देत आहे. तसेच, ते पूर्वीपेक्षा डिजिटल पद्धतीने चांगले बनवले जात आहे. आजच्या काळात प्लॅटफॉर्म आणि जनरल तिकीट ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येऊ शकणार आहे.