नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने JioTag Go लाँच केले आहे. हा एक ब्लूटूथ ट्रॅकर आहे जो Google च्या Find My Device नेटवर्कसह कार्य करतो. नेटवर्कसोबत काम करणारा हा भारतातील पहिला ट्रॅकर आहे. हा ट्रॅकर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. त्याच्या मदतीने, युजर्सना Google चे Find My Device ॲप वापरून रिअल टाईममध्ये त्यांच्या वस्तूंचा मागोवा घेऊ शकतात.
जिओच्या वेबसाईट्नुसार, डिव्हाईस जवळपासच्या Android डिव्हाईसचा वापर करते. ट्रॅकर ब्लूटूथ रेंजच्या बाहेर असला तरीही JioTag Go युजर्सला लोकेशन अपडेट करतो. याच्या मदतीने युजर्स त्यांच्या वस्तूंचे ठिकाण कुठूनही जाणून घेऊ शकतात. JioTag Go च्या मदतीने तुम्ही तुमच्या चाव्या, वॉलेट, पर्स, गॅजेट्स इत्यादी लिंक करू शकता. JioTag Go ची किंमत 1499 रुपये असून, तुम्ही ते Amazon, JioMart, Reliance Digital आणि My Jio स्टोअर्समधून खरेदी करू शकता.
Jio चा हा डिव्हाईस अनेक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये काळा, पांढरा, नारिंगी आणि पिवळा यांचा समावेश आहे. JioTag Go सेट करणेही अगदी सोपे आहे. त्यासाठी तुमच्या फोनवर Google Find My Device ॲप इन्स्टॉल करा. यानंतर JioTag चालू करा तुमच्या फोनजवळ जा.
नंतर फास्टपेअर पॉपअप दिसल्यावर ‘कनेक्ट’ पर्यायावर टॅप करा. येथे Agree and continue पर्यायावर क्लिक करा. सेटअप पूर्ण करण्यासाठी Complete बटणावर टॅप करा. अशाप्रकारे तुम्ही कनेक्ट करू शकता.