नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आपले नवे Smart Door Lock 2 लाँच केले आहे. यातील विशेष बाब म्हणजे कंपनीने यात AI चा सपोर्ट देखील दिला आहे. या फीचरच्या माध्यमातून हे लॉक आणखीच स्मार्ट बनते. ग्राहकांकडून या लॉकला चांगली पसंतीही मिळत आहे.
Xiaomi च्या Smart Door Lock 2 मध्ये आवाज कमी करणारी ऑटोमॅटिक सिस्टिम देण्यात आली आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे सर्व वयोगटातील लोकांना लक्षात घेऊन दरवाजाचे कुलूप तयार करण्यात आले आहे. लहान मूल असले तरी ज्यांना जास्त उंची गाठता येत नाही त्यांच्यासाठीही ते काम करते. यामध्ये एआय स्मार्ट कॅट आय देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने काही अंतरावर बसून दरवाजाकडे लक्ष देता येते.
या स्मार्ट लॉकमध्ये 2.3 मेगापिक्सलचा हाय डेफिनेशन कॅमेरा देण्यात आला असून, ज्याचा व्ह्यूइंग अँगल 160 डिग्री आहे. या लॉकमध्ये 3D नुसार चेहरा ओळखण्याची सिस्टिम असून, त्याच्या माध्यमातून चेहरा कॅप्चर करण्यासाठी ते अनव्हिजीबल लाईट वापरते. याचे अनलॉकिंग सिस्टिम पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे याला कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नाही.
यामध्ये सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून, फोटो किंवा व्हिडिओ वापरूनही ते उघडता येणार नाही. म्हणजे ते अनधिकृतपणे उघडणे शक्य नाही. Xiaomi चा Smart Door Lock 2 हा आपल्याला ऑनलाईन खरेदी करता येऊ शकणार आहे. याची ऑनलाईन किंमत 14,820 असून, आपल्याला तो खरेदी करता येणार आहे.