नवी दिल्ली : स्मार्टफोन वापरताना चार्जिंग देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणती केबल घ्यावी आणि त्याचा वापर कसा करावा हा प्रश्न पडतो. पण आता तुम्हाला पॉवर फ्रेंडली पॉवर केबल एक उत्तम पर्याय असू शकतो. सतत प्रवासात असल्यास किंवा पॉवर सॉकेट शोधणे कठीण असल्यास, बॅटरी संपण्याची चिंता सतत असू शकते. अशात आपण एक पॉवर बँक सोबत ठेवतो. पण हे तितकेसे कॅरी फ्रेंडली असेलच असे नाही.
पॉकेट फ्रेंडली पॉवर केबल ही एकाच केबलमध्ये पॉवर बँक आणि चार्जिंग केबल दोन्हीची कार्यक्षमता एकत्रित करते. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या डिव्हाईसला चार्ज करण्यासाठी दोन वेगवेगळ्या वस्तू घेऊन जाण्याची गरज नाही. पोर्टल कॉर्डमध्ये दोन मुख्य भाग असतात. ही एक सामान्य चार्जिंग केबल आहे जी तुमच्या डिव्हाईसशी कनेक्ट होतो. अनेक प्रकारच्या पोर्टल कॉर्ड उपलब्ध आहेत, ज्यामध्ये USB-A, USB- C, Lightning आणि इतर कनेक्टर समाविष्ट आहेत.
पॉवर बँक हे केबलमध्ये बिल्ट-इन बॅटरी आहे जी तुमच्या डिव्हाइसला चार्ज करण्यासाठी ऊर्जा साठवते. पॉवर बँकची क्षमता mAh मध्ये मोजली जाते, जी किती चार्ज स्टोअर करू शकते हे दर्शवते. पोर्टल कॉर्ड घेऊन जाणे सोपे आहे कारण ते एकाच केबलमध्ये दोन वस्तू एकत्रित करते. त्यामुळे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.