नवी दिल्ली : सध्या अनेक हेडफोन्स, स्पीकर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण कोणता घेऊ अन् कोणता नको असे अनेकांचे होत असते. मात्र, तुम्ही ब्लुटूथ स्पीकर घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला Noise Vibe 2 हा स्पीकर उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये 52 मिमी ऑडिओ ड्रायव्हर्स असून, नॉईज टू ब्रास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
Noise च्या Vibe 2 या ब्लुटूथ स्पीकरमध्ये तुम्हाला व्हॉईस व्हॉल्यूम कंट्रोलसारखे अनेक बटन्स मिळतील. या स्पीकरमध्ये एक छोटासा पट्टाही देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ते सहजपणे कुठेही नेऊ शकता. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ब्लूटूथ 5.3 फीचर मिळत आहे. यात बिल्ट इन मायक्रोफोन देखील आहे. हा स्पीकर Hey Siri आणि OK Google व्हॉईस असिस्टंटला देखील सपोर्ट करतो. याशिवाय हा स्पीकर IPX5 वॉटर रेसिस्टंट आणि TF कार्डलाही सपोर्ट करतो.
Noise चा नवीन पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर 5W चा पॉवर आउटपुट देतो. यामध्ये 52 मिमी ऑडिओ ड्रायव्हर्स देण्यात आला आहे. याशिवाय, यात नॉईज टू ब्रास तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या स्पीकरच्या साहाय्याने 15 तास गाणी ऐकता येतील, असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. हा स्पीकर 1,499 रुपयांमध्ये ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.